चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !
अनेकदा तुम्ही पाहिले असेल आणि ऐकले असेल की, कंपनीची स्थापना करण्यापूर्वी त्यासाठी अनेक योजना आखल्या जातात. विपणनाकडे विशेष लक्ष ठेवले जाते. मोठमोठ्या योजना आखल्या जातात आणि त्यानंतर कंपनीच्या यशाबाबत विचार केला जातो. मात्र तुम्ही त्यांच्या बद्दल काय म्हणाल, ज्यांनी कधीच शाळेचे तोंड पाहिले नाही, व्यावसायिक शाळेबाबत ऐकणे तर त्यांच्यासाठी शक्यच नाही. अशाच चार आदिवासी महिला आहेत.
राजस्थानच्या जंगलात ज्या सीताफळाची झाडे कापून आदिवासी जाळण्यासाठी घेत होते, तेच सीताफळ पाली जिल्ह्याच्या आदिवासी समाजाचे नशीब उजळवत आहे. त्याची सुरुवात केली आहे, जंगलात लाकूड कापणा-या चार आदिवासी महिलांनी. अरावलीच्या डोंगरावरील काटेरी झाडांवर उन्हाळ्यात निर्माण होणा-या सीताफळ ज्याला ‘शरीफा’ देखील म्हणतात, झाडांवर वाळून किंवा पिकून खाली जमिनीवर पडायचे. लाकूड कापणा-या महिला हे वेचून विकत असत. तेव्हापासूनच या चार मैत्रिणीनी रस्त्याच्या कोप-याला टोपली ठेवून सीताफळ विकण्याच्या या व्यवसायाला सुरुवात केली आणि एक कंपनी बनविली, ज्याची वार्षिक उलाढाल एक कोटीं पर्यंत पोहोचली आहे. आता आदिवासी आपल्या क्षेत्रात होणा-या सीताफळाच्या उत्पादनाला टोपलीत विकायचे सोडून, त्याचे पल्प काढून राष्ट्रीय पातळीवर कंपन्यांना विकत आहेत. सध्या पालीच्या बाली क्षेत्राच्या या सीताफळाला प्रमुख आईस्क्रीम कंपन्यांमध्ये मागणी आहे.
या सोबतच लग्न आणि मेजवानी यांसारख्या कार्यक्रमात पाहुण्यांना देण्यात येणारी फ्रुट क्रीम देखील सीताफळाने तयार होत आहे. सध्या संपूर्ण बाली भागात जवळपास अडीच टन सीताफळ पल्पचे उत्पादन करून याला देशाच्या प्रमुख आईस्क्रीम कंपनीपर्यंत पोहोचविले जात आहे. आदिवासी महिलांनी टोपलीत भरून विकणा-या सीताफळाचे आता पल्प काढणे सुरु केले आहे. हेच पल्प सरकारी मदतीने बनलेल्या आदिवासी महिलांची कंपनीच त्यांच्या महागड्या किंमतीवर विकत घेत आहेत.
या प्रकल्पाची सुरुवात भिमाणा – नाणा मध्ये चार महिला जिजाबाई, सांजीबाई, हंसाबाई आणि बबली यांनी ‘घुमर’ नावाची एक स्वयंसेवी संस्था बनवून केली होती. याचे संचालन करणा-या जिजाबाई यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “आमचे कुटुंब शेती करायचे आणि मी लहानपणी सीताफळ खराब होताना पहायचे, तेव्हापासून विचार करायचे की, इतके चांगले फळ आहे, त्याचे काहीतरी केले जावे. मात्र जेव्हा एका स्वयंसेवी संस्थेत काम करणा-या गणपतलाल यांची भेट झाली, तेव्हा स्वयंसेवी संस्था बनविली आणि सरकारकडून मदत मिळाली, तेव्हा व्यापार वाढत गेला आणि तेव्हा आमचे उत्पादन वाढवत गेलो, सोबतच दुस-या महिला देखील फायदा बघून सामील व्हायला लागल्या.”
आठ जागांवर संकलन केंद्र, प्रत्येक गावात उघडण्याचे लक्ष्य
सीताफळचे पल्प काढण्याचे काम पाली जिल्ह्याच्या ग्रामपंचायत भिमाणा आणि कोयलवावचे गाव भिमाणा, नाडीया, तणी, उपरला भिमाणा चौपाची नाल, उरणा, चिगटाभाटा, मध्ये आठ केंद्रांवर काम होत आहे. ज्यात १४०८महिला सीताफळ जंगलातून निवडण्याचे काम करत आहेत. येथे महिला आता स्वयंसेवी संस्था बनवत आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे की, पुढील वर्षापर्यत ते या भागातील प्रत्येक गाव आणि ढाणीत पोहोचविण्यासोबतच पाच हजार महिलांना सामील करून घेतील. सीताफळचे पल्प काढण्याचा प्रकल्प पूर्णत: हायजेनिक आहे, ज्यात कुठल्याही महिलेला प्रवेश करण्यापूर्वी त्याला रासायनिक द्रवरूप पदार्थाने हात पाय धुवावे लागतात. पल्पला हात लावण्यापूर्वी गोल्व्ज घालणे गरजेचे आहे. त्यासोबतच महिलांसाठी प्लांटमध्ये प्रवेश करताना विशेष कपडे देखील ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून पल्पला कुठल्याही किटाणूने वाचविले जाऊ शकेल. पल्प काढताना देखील चेह-यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या महिलांना प्रेरित करून प्रशिक्षण देणारे गणपतलाल सांगतात की, महिला शिक्षित नाहीत, मात्र त्यांच्यात काही करण्याची आणि शिकण्याची भावना होती आणि त्याच कारणामुळे आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी इतकी मोठी कंपनी तयार केली आहे.
चार महिलांनी सुरुवात केली, आता गावागावात बनला गट
जंगलात सीताफळ गोळा करून महिलांच्या उद्योजिका बनण्याची ही देशातील वेगळी योजना आहे. सीताफळ पल्प प्रोसेसिंग युनिट २१.४८लाख रुपयांच्या भांडवलातून उघडण्यात आले आहे, नाणा येथील युनिटचे संचालन महिला करत आहेत. महिलांचे हे यश बघून सरकार कडून बिज भांडवल (सिड कैपीटल रीवोल्विंग फंड) देखील देण्यात येत आहे. रोज येथे ६०ते ७०क्विंटल सीताफळचे पल्प काढण्यात येत आहे. आता आठ संकलन केंद्रावर ६० महिलांना प्रतिदिन रोजगार देखील मिळत आहे. त्यांना १५०रुपये दररोजची मजुरी मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण भागात महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली तर झाली आहे, सा-यांची गरिबी दूर झाली आहे.
कलेक्शनच्या प्रभारी सांजी सांगतात की, “पूर्वी टोपलीत सीताफळ विकायचो, तेव्हा आठ दहा रुपये किलो मिळायचे, मात्र आता जेव्हा प्रोसेसिंग युनिट उभी केली आहे, तेव्हा आईस्क्रीम कंपन्या १६०रुपये प्रती किलो पर्यंत किंमत देत आहेत.”
यावर्षी १०टन पल्प राष्ट्रीय बाजारात विकण्याची तयारी, उलाढाल एक कोटींच्या बाहेर जाईल
२०१६मध्ये घुमरचे १५टन पल्प राष्ट्रीय बाजारात विकण्याचे लक्ष्य आहे. मागील दोन वर्षात कंपनीने १०टन पल्प विकले आहे आणि आता बाजारात आता पल्प चा सरासरी भाव १५०रुपये मानला तर, ही उलाढाल तीन कोटींपर्यंत पोहोचण्याची आशा आहे.
अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStoryMarathi Facebook पेजला भेट द्या. लाईक करा.
आता वाचा संबंधित कहाण्या :
महिला सक्षमीकरणाची अनोखी कहाणी: मंजुळा वाघेला!
विदर्भात कापसाची यशस्वी शेती, निराश शेतक-यांसमोर आदर्श लिलाबाईंचा!
केवळ पाच रुपये नसलेल्या महिला झाल्या आत्मनिर्भर, सूरु केली स्वतःची बँक!
लेखक : रिंपी कुमारी
अनुवाद : किशोर आपटे