‘एग्झाम१८’ हे ई-कॉमर्स पोर्टल आहे. शिक्षकांच्या सोबतीने हे पोर्टल र्विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सर्वात चांगली तयारी करवून घेते. सुरूवातीच्या काळात या पोर्टलची सुरूवात ‘एग्झामगेसपेपर्सडॉटकॉम’ या नावाने झाली होती. या द्वारे शाळेच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका विकण्यात येत होत्या. याबरोबर ‘आयसीएसई’च्या शिक्षकांसोबत करार करून ‘आयसीएसई’चे गेस पेपर्स बुक्स आणि ई-बुक्स तयार करण्याचे काम करण्यात येत होते. शिवाय ते ‘एग्झामगेसपेपर्सडॉटकॉम’वर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याचे देखील काम चालत होते. ‘एग्झाम१८’ या ई-कॉमर्स पोर्टलची सुरूवात डिसेंबर, २०१२ मध्ये जयपूरला झाली. ही चिराग अग्रवाल यांच्या कल्पनेतून हे पोर्टल साकारले आहे. चिराग हे जयपूरच्या ‘ग्लोबल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.
प्रारंभ
शाळेत शिकत असतानाच चिराग अग्रवाल यांनी विविध कंपन्यांसाठी पाच पेक्षा अधिक वेबसाईट्स डिझाईन केल्या होत्या. ते अभ्यासात अजिबात हुशार नव्हते हे त्यांनी कबूल केले. मोठ्या मुश्किलीने ते परीक्षेत पास होत असत. मात्र दहावी इयत्तेत गेल्यानंतर त्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले आणि आपल्या शिक्षकांकडून त्यांना जितक्या शक्य होतील तितक्या नोट्स त्यांनी गोळा केल्या. दहावीची परीक्षा ते डिस्टिंक्शनमध्ये पास झाले ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट ठरली.
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ‘हेब्रूगार्डेनडॉटकॉम’ या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी त्यांनी वेबसाईट बनवण्याचे काम सुरू ठेवले. याद्वारे त्यांची चांगली कमाई होऊ लागली. प्रश्नपत्रिका प्राप्त करणे विद्यार्थ्यांसाठी खूपच जिकिरीचे काम असल्याची माहिती चिराग अग्रवाल यांना शिक्षकांशी बोलताना मिळाली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्टडी मटेरिअल उपलब्ध करून देणे ही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधीच होती. यामुळे आपले स्टडी मटेरिअल विद्यार्थ्यांना विकण्यामध्ये देखील शिक्षकांसाठी सोयीचे होणार होते. यासाठी त्यांनी इयत्ता दहावीत असताना जमा केलेले शाळेच्या पूर्वपरीक्षांच्या प्रश्नपत्रिका अपलोड केल्या.
प्रगती करणे
आपल्या आई-वडिलांच्या प्रेरणेमुळे, तसेच आपली स्वत:ची कंपनी सुरू करण्याच्या त्यांच्या तीव्र इच्छेमुळे कॉलेजच्या अभ्यासाच्या व्यस्ततेतून चिराग अग्रवाल या कामासाठी कसाही वेळ काढत असत. याबाबत बोलताना चिराग म्हणाले, “ मी केव्हाही काही नवे सुरू करावे यासाठी शिक्षण पूर्ण होण्याची वाट पाहिली नाही. दोन वर्षांमध्येच मोठ्या संख्येने प्रश्नपत्रिकेचे नोंदणीकृत सदस्य झालेले होते. गेल्या महिन्यात ‘एग्झाम१८डॉटकॉम’मध्ये बदल होण्यापूर्वी आमच्या पोर्टलवर चार लाखाहून अधिक नोंदणीकृत सदस्य झालेले होते.”
‘एग्झाम१८’ने ऑगस्ट, २०१३ पासून ऑर्डर्स घेणे सुरू केले होते. चार महिन्यांच्या आतच ४००० ऑर्डर्स त्यांनी पूर्ण करून टाकल्या. चिराग अग्रवाल हे लोकप्रिय होत जाणारे काम एक जयपूर आणि दुसरे मुंबई अशा दोन ठिकाणी असलेल्या कार्यालयातून चालवतात.
उद्याचा प्रवास
चिराग अग्रवाल यांच्या मते ‘फ्लिपकार्ट’, ‘अन्फिबीम’, ‘इंडियाटाईम्सशॉपिंग’ सारख्या ई-कॉमर्स साईट्सना मिळालेल्या यशाने त्यांचे काम सोपे करून टाकले आहे. कारण अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेले स्टडी मटेरिअल लोक पूर्वीपासूनच विकत घेत होते.
आपल्या अभ्यासक्रमातील अभ्यासासाठी पारंपारिक पुस्तके आणि गाईड्स ऐवजी जे विद्यार्थी सुधारित पद्धतीच्या नोट्सच्या आधारे आपला अभ्यास करू इच्छित होते अशा विद्यार्थ्यांना ‘एग्झाम१८’ने आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते. चिराग अग्रवाल यांच्याकडे एक ‘ऑथर्स प्रोग्रॅम’ सुद्धा आहे. या प्रोग्रॅम अंतर्गत ते शिक्षकांसोबत सामंजस्य करून त्याच्याकडून अभ्यासासाठी मजकूर घेतात. या बदल्यात ते शिक्षकांना पैसेही देतात.
जे आपला छंद पूर्ण करण्याची हिम्मत दाखवतात केवळ अशा लोकांचाच नव्हे, तर जे आपले स्वप्न साकार करण्यासाठी इतरांना देखील प्रोत्साहित करतात अशा चिराग अग्रवाल यांच्यासारख्या लोकांचा सुद्धा मॅकडॉवेल्स नंबर १ प्लॅटिनम सन्मान करते. इतकेच नाही, तर त्यांच्या या असाधारण प्रवासात ते भागीदार देखील बनतात.