Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

महिला नेतृत्वाचे प्रतिक - ग्लोबललॉजिकच्या ए.नंदिनी

महिला नेतृत्वाचे प्रतिक - ग्लोबललॉजिकच्या ए.नंदिनी

Saturday March 05, 2016 , 5 min Read

ग्लोबललॉजिक या कंपनीत जून २००७ मध्ये इंजिनिअरिंग अॅण्ड डिलिव्हरी व्हिपी (अभियांत्रिकी आणि वितरण उपाध्यक्ष) म्हणून ए. नंदिनी रुजू झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा आणि संस्थेचा विकास बरोबरच झाला आहे.

" संस्था स्पर्धेत उतरताना, केंद्र मिळवताना आणि भौगोलिक क्षेत्र व्याप्ताना मी पाहिले आहे." नंदिनी रुजू झाल्या तेव्हा तीन प्रकल्प आणि ५० जण होते. आज त्या नाॅयडा केंद्र सांभाळत आहेत ज्यातच मुळी १२०० हून अधिक कर्मचारी आहेत. नंदिनीबरोबर आम्ही त्यांच्या कारकिर्दीविषयी, ग्लोबललॉजिकमधल्या त्यांच्या प्रवासाविषयी गप्पा मारल्या. या प्रवासात त्यांनी पेललेली आव्हाने, आव्हानांना सामोरे जाताना मिळालेली शिकवण याबाबतही त्यांनी सांगितले. या गप्पांचा सारांश खास तुमच्यासाठी.

image



कारकीर्द बहरली

तामिळी वंशाच्या नंदिनी यांचा जन्म आणि बालपण दिल्लीतलेच. आपण पक्क्या दिल्लीकर असल्याचे त्या आनंदाने आणि अभिमानाने सांगतात. ''माझ्या आयुष्यातील काही सर्वोत्तम दिवस मी दिल्ली विद्यापीठात उपभोगले आहेत." त्यांनी गणित आॅनर्स आणि एमसीए केले आहे. त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कॅम्पस मुलाखतीतून त्या टाटा युनिसिस लिमिटेड कंपनीत रुजू झाल्या. मोठ्या कंपनीत काम केल्याचा त्यांना फायदा झाला. चांगला वाव मिळाला. मोठ्या टीमबरोबर कसे काम करायचे ते शिकायला मिळाले. पाच वर्षांनंतर नंदिनी टेलिकॉम क्षेत्राकडे वळल्या." मला टेलिकॉम क्षेत्रात चाचपणी करून पाहण्याची इच्छा होती." त्या सांगतात . दोन वर्षांनंतर त्यांना असे जाणवले की हे क्षेत्र असेच त्यांच्या वाट्याला आलेले नाही. त्यामुळे मनापासून जे करायची इच्छा आहे त्यासाठी प्रयत्न करायचे त्यांनी ठरवले. इंटेरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अतिशय छोट्या कंपनीत काम करायचे नंदिनीने ठरवले. त्यांना स्वतःला विकसित व्हायचे होते. "मला वाटते मी ५० वी वगैरे अशीच कर्मचारी होते. तेव्हा पूर्ण विकसित झालेला विभाग त्यांच्याकडे नव्हता. एच आर पॉलिसीसारख्या गोष्टी मार्गी लागत होत्या. मग आम्ही सर्व गोष्टी सुरुवातीपासून करायच्या असे ठरवले. हे सर्व करणे मोठा अनुभव होता. इथे माझा टाटा युनिसिसमधला अनुभव कामी आला. तंत्रज्ञान आणि वितरण याबरोबरच व्यवस्थापकीय कौशल्यावरही मी माझे लक्ष केंद्रित करू शकले. सीएमएम पातळी पाच प्रमाणपत्रासाठी मी नेतृत्व केले. तो मोठा मैलाचा दगड ठरला. "

image


ग्लोबललॉजिक

मी नाॅयडाची वितरण प्रमुख आणि केंद्र प्रमुख आहे. त्यामुळे या केंद्राची स्थिती आणि विकास याची जबाबदारी प्रामुख्याने माझ्यावर आहे. वितरण प्रमुख म्हणून वितरित केलेली प्रत्येक वस्तू स्वतःच तिच्या गुणवत्तेबाबत कसे सांगेल आणि ग्राहकाला कसा उत्तम अनुभव देईल, समाधान देईल याची जबाबदारी माझ्यावर आहे. नाविन्य आणून वस्तू दरवर्षी कशा अधिक चांगल्या, वेगळ्या करता येतील यासाठी आमचा प्रयत्न असतो.

ग्लोबललॉजिक बरोबरच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळाळत असतो. " ही आठ वर्षे खूप आनंदाची होती. संस्था वाढत असताना मी पाहिले आणि मीही संस्थेबरोबर वाढले. दुर्मिळ संस्थांपैकी ही संस्था आहे जिथे एकाच ठिकाणी बसून तुम्हाला अनेक संस्कृतींचा अनुभव घेता येतो. मला युक्रेन, अर्जेंटिना, स्लोव्हाकिया समजले. मला वाटते दुसरीकडे कुठे अशी संधी मला मिळाली नसती. इथे तुम्हाला लोकांची मानसिकता कळते. इथे तुम्हाला नेहमीच काहीतरी शिकायला मिळते. सगळे जण ग्लोबल असण्याबद्दल बोलतात. मला वाटते आम्ही खऱ्या अर्थाने ग्लोबल आहोत. समन्वय आणि संवाद इथे सातत्याने घडत असतात. प्रचंड माहिती,आयओटी, क्लाउड आणि अशा इतर मोठ्या क्षेत्रांशी ग्लोबललॉजिक संबंधित आहे. उत्तरे वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित असतात आणि ती एकाच क्षेत्राच्या आधारे देता येत नाहीत. हीच मौलिक भर आम्ही घालतो" नंदिनी सांगतात. " सतत नावीन्यपूर्ण शोधांवर आमचा भर असतो. वेगवेगळ्या क्षेत्रांचा संबंध जोडून उत्तरे पर्याय पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करतो."

तंत्रज्ञानातले कल

सध्याचे जे कल आहेत त्याबाबत बोलायचे झाले तर मला असे वाटते की वास्तव आणि काल्पनिक यातल्या सीमारेषा पुसट झाल्या आहेत.

इंटरनेट ऑफ थिंग्समुळे बदलेल्या गोष्टी, स्मार्ट तंत्रज्ञानाचा पगडा , नाविन्यपूर्ण शोध याबाबत त्या विषद करतात . काॅन्टॅक्स्ट्युअल इंटेलिजन्सचा अर्थात आकडेवारी, संदर्भ माहिती, विश्लेषण यांचा व्यावहारिक वापर यामुळे लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यायला साहाय्य होत आहे.

आव्हाने

''सुरुवातीला प्रारंभिक म्हणून ज्या काही अडचणी असतात त्या होत्याच,'' आव्हानांबद्दल त्या सांगतात . ''कठीण आव्हाने होती पण त्यातून खूप काही शिकायला मिळाले . मुख्य म्हणजे मी माझ्या टीमचे आभार मानते . मला असे वाटते आपण जे काही चांगले वाईट असतो ते आपल्या टीमनुसारच असतो ." कार्यकारी व्यवस्थापनाकडूनही चांगला पाठिंबा मिळाल्याचे त्या सांगतात . ग्लोबललॉजिकचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी शशांक सामंत यांच्या मार्गदर्शनाचे त्या कौतुक करतात ." शशांक नेहमीच मोठा आधारस्तंभ राहिला आहे . जेव्हाजेव्हा काही अडचण येते, द्विधा मनस्थिती होते तेव्हातेव्हा शशांक सल्ला देतो, मदत करतो. त्यामुळेच माझा इथवरचा प्रवास यशस्वी ठरला आहे. सर्वांनी दिलेल्या साहाय्याबाबत मी आभारी आहे ."

लिंगभेदाच्या भिंती

नंदिनीसाठी लिंगभेदाच्या भिंती अस्तित्वात नाहीत. त्यांच्या मते स्त्रिया कारण म्हणून या गोष्टीचा वापर करतात. त्यांना जिथपर्यंत जायचे असते तिथपर्यंत त्या पोहोचत नाहीत म्हणून अशी कारणे देतात. त्यांच्या मते राखेतूनही भरारी घेणाऱ्या महिला असतात आणि त्याबाबत त्या फुशारकी दाखवत नाहीत. आपण कोणी मोठे असल्याचा आव त्या आणत नाहीत. त्याचे त्यांना कौतुक वाटते.

नंदिनी ग्लोबललॉजिकची वेबसाईट दाखवतात. या संकेतस्थळावर अनेक महिला नेतृत्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. त्यांच्याकडे स्वतःकडे एका मोठ्या केंद्राची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाधिक महिला भर्ती करण्याबाबत तसेच स्त्रियांकडे नेतृत्व देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा त्यांना कायम पाठिंबा असतो.

"आमची कंपनी महिलाभिमुख कंपनी आहे. आमच्या कंपनीत पाळणाघर आहे. महिला तिथे आपली मुले ठेवू शकतात. त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतात आणि कुठलीही काळजी न करता शांतपणे काम करू शकतात. लक्ष्यपूर्ती अपेक्षित आहेच पण आमच्या कामाच्या वेळा शिथिल आहेत. एखाद्या टीममधील स्त्रियांची संख्या कमी होताना आढळली तर आम्ही त्याची लगेच दखल घेतो.

त्यांच्या एका मैत्रिणीने सुरू केलेल्या वाइज अर्थात वुमन इन्स्पायरण्ड् टू शाइन अॅण्ड एक्सेल या उपक्रमाला त्या मदत करतात.

उच्चपद सांभाळताना

आपल्या मुलांच्या अवतीभवती नसल्याची खंत नंदिनींना कधी कधी वाटते. पण अपराधी भावना बाळगण्याऐवजी त्यावर पर्याय शोधायला पाहिजे असेही त्यांना वाटते. त्यांच्या मते तुम्ही उच्च पदावर आहात म्हणजे सुपरवुमन असलेच पाहिजे असे नाही. घरच्या - बाहेरच्या कामांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न मी करते. एखादा शनिवार - रविवार मी मुलांसाठी स्वयंपाक करते. गाडी चालवायला मी ड्रायव्हर ठेवला आहे. जेणेकरून गाडी चालवायचा ताण यायला नको. त्यामध्ये जाणारी ऊर्जा, वेळ वाचवता येतात. प्रवासाचे हे दोन तास कसे उपयोगात आणता येतील ते मी पाहते. त्या वेळेत मी सगळे फोन कॉल्स घेते.

धडा

नंदिनी सांगतात, "तुमच्याकडे कामाला माणसे आहेत म्हणजे तुम्ही नुसते बसू शकता, आराम करू शकता असे नाही. शिकणे ही कायमस्वरूपी प्रक्रिया आहे. तुम्ही कायम ड्रायव्हरच्या सीटवर असले पाहिजे. लक्ष्यावरून तुमची नजर कधीही ढळता कामा नये."

कठोर परिश्रमांवर त्या खूप भर देतात. तरुण पिढीला जरी लगेच आपली दखल घेतली गेली पाहिजे असे वाटत असले, गोष्टी सहज आपल्या आवाक्यातील वाटत असल्या तरी यशासाठी शॉर्टकट नसतात. त्या सांगतात. भविष्यात ग्लोबललॉजिकच्या खूप मोठ्या योजना आहेत. येत्या काही काळात आमचा दुपटीने विस्तार होईल अशी आशा आहे. तशी आमची इच्छा आहे असे सांगून त्या निरोप घेतात.

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सर्वसामान्यांपर्यंत कला पोहचवण्याकरता कलाकार, क्युरेटर आणि उद्योजिका सुरभी मोदींचे अथक प्रयत्न

कॉस्मेटोलॉजीच्या क्षेत्रात ʻसिडक्शन लास वेगासʼच्या मोनिशा यांची गरुडभरारी

रॉकएनशॉपः ऑनलाईन प्रिमियम लक्झरी उद्योगातील उगवता तारा

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : सोनाली कुलकर्णी-काकडे