Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

देशी किंमतीत विदेशी फॅशनचा तडका 'फॅब ऐली'

हजारो स्टाइलचे कपडे एकाच ठिकाणी.... २०१२ मध्ये सुरु झाला व्यवसाय.... प्रत्येक महिन्यात एक करोडची कमाई   

देशी किंमतीत विदेशी फॅशनचा तडका 'फॅब ऐली'

Saturday May 07, 2016 , 4 min Read

ई – कॉमर्सच्या क्षेत्रात आपण फ्लिपकार्ट, मंत्रा, जबांग इत्यादी दुसरी संकेतस्थळे आहेत, जेथे जाऊन लोक खूप शॉपिंग करतात. या संकेतस्थळांवर गरजेच्या प्रत्येक गोष्टी असतात. लोकांची वाढती मागणी पाहून आपण या संकेतस्थळांवर खासगी ब्रांड देखील बघतो. खरंतर हा ब्रांड स्वतः विभिन्न वस्तु बनविणारे निर्माता असतात, ज्यांचे बनविलेले सामान बाजारात देखील सहजरीत्या मिळते. याच निर्मात्यांपैकी एक “फॅब एली” आहेत. ज्याची बाजारात केवळ आपापली जागाच नाही तर, ते स्वतः एक स्थापित ब्रांड झाले आहे.

“फॅब एली”ची सुरुवात तन्वी मलिक आणि शिवानी पोद्दार यांनी मिळून केली होती. या कामाला सुरु करण्यासाठी या दोघांनी आपल्या चांगल्या नोकरीला देखील ठोकर मारली. “फॅब एली”च्या स्थापनेपूर्वी हे लोक टायटन इंडस्ट्री, युनिलीवर यांसारख्या मोठ्या कंपनीत काम करायचे. तन्वी मलिक यांच्या मते, “आम्ही दोघी कोर्पोरट सेक्टरमध्ये काम करत होतो. त्या दरम्यान आम्हाला असे दिसले की, फॅशनबाबत अनेक विविधता आहेत आणि देशात त्या चालविणे खूपच कठीण आहे. त्या दरम्यान मँगो, जरा यांसारख्या दुकानांमध्ये ९०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत कुठलीही वस्तू मिळत नव्हती.” तर देशात अधिकाधिक महिला नियमितरित्या घालणारे कपडे ९०० ते १०००रुपया दरम्यानच पसंत करतात. हे अंतर भरून काढण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन कुठेही पर्याय नव्हता. 

image


तेव्हा दोघांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर बाजाराचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ५०० महिलांना देखील सामील केले गेले, ज्या आपल्या गोष्टी लिहून किंवा अन्य प्रकारे सांगू शकत होत्या. तेव्हा ६० टक्के महिलांच्या मते, त्यांनी फॅशनच्या बाबतीत असलेल्या अंतराला जाणले आहे. त्या दरम्यान फॉरएवर २१ एकमेव असे ब्रांड होते, जे हे अंतर कमी करत होते. मात्र संपूर्ण देशात त्यांची मुठभर दुकाने होती. शिवानी अभिमानाने सांगतात की, “सुरुवातीपासूनच आम्हाला माहित होते की, ही जागा भरण्यासाठी आमच्याकडे १०००पेक्षा अधिक स्टाइलचे कपडे असले पाहिजे. त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक महिन्याला २०० वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे बाजारात आणू लागलो आणि त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय ब्रांडला टक्कर देण्यासाठी पुरेशी होती.”

असे असूनही या रस्त्यावर पाय ठेवण्यापूर्वी दोन्ही संस्थापकांची इच्छा होती की, त्यांनी ऍक्सेसरी स्टोरमध्ये आपले नशीब आजमावले पाहिजे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या चार महिन्या दरम्यान दागिने, बूट, बॅग आणि दुस-या अनेक वस्तू विकण्यास सुरुवात केली होती. मात्र लवकरच त्यांना याबाबतची जाणीव झाली होती की, बाजारात केवळ ऍक्सेसरीवर अवलंबून राहून चालणार नाही आणि तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, त्यांना नियमितरित्या घालणा-या कपड्यांच्या क्षेत्रात देखील उतरले पाहिजे.

आज “फॅब एली”चा जवळपास ८५ टक्के व्यवसाय नियमितरित्या घालणा-या कपड्यांचा होता. जो त्यांनी जून, २०१२ पासून सुरु केला होता. तन्वी यांचा दावा आहे की, त्या फायदा कमवत आहेत आणि प्रत्येक महिने एक कोटी रुपयांचे उत्पन्न होत आहे. मागील तीन महिन्या दरम्यान त्यांचा व्यवसाय ६० टक्के वाढला आहे.

“फैब एली”मध्ये मिळणा-या कपड्यांचे नक्षीकाम स्वतः एक डिजाइनर गट करतो. असे असूनही कंपनीने ऍक्सेसरीसाठी चीन, लंडन आणि दुस-या देशातील विक्रेत्यांसोबत सामंजस्य केले आहे. व्यवसायाच्या सुरुवातीस विक्रीची गती थोडी हळू होती, मात्र हळू हळू कामाने गती पकडली. तन्वी यांच्या मते, “फॅब एली”ला फॅशनची ओळख आहे, त्यासाठी गतीने बदलणा-या फॅशनवर त्या तीन महिन्यापूर्वीपासूनच काम करणे सुरु करतात. बदलत्या फॅशनचे संकेत आम्हाला जगात सुरु असलेल्या ट्रेंड, फॅशन ट्रेंड आणि पहिलेच्या फॅशन ट्रेंड बघून मिळतो. हीच बाब ऍक्सेसरीच्या प्रकरणात देखील आहे.

“फॅब एली”च्या सर्वात अधिक ग्राहक त्या महिला आहेत, ज्यांचे वय २२पासून ३०वर्षा दरम्यान आहे, ते त्यांच्यासाठी खास आहे. त्या व्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, बंगळूरू इत्यादी शहरातून बल्क मध्ये ऑर्डर बुक केले जातात. तन्वी यांच्या मते, आम्ही लोक सलग दुस-या शहरात देखील आपला विस्तार करत आहेत आणि आता आमची योजना श्रेणी २ शहरांपर्यंत आपली ओळख निर्माण करण्याची आहे. “फॅब एली” आपल्या विपणनासाठी फेसबुक आणि गुगलचा चांगला वापर करतात. त्या व्यतिरिक्त पीआर एजन्सीच्या मदतीने विभिन्न वृत्तपत्रात त्यांच्या कामाची खूप चर्चा होते. या कामात फॅशन ब्लॉगर देखील त्यांची खूप मदत करतात. तन्वी यांच्या मते, “आम्ही फॅशन ब्लॉगर सोबत खूप काम केले आहे, जसे हाय हिल, पोपक्सो. ज्याचे खूप फॉलोअर्स आहेत. हेच कारण आहे की, आम्ही त्यांच्यासोबत मिळून अनेक स्पर्धा आयोजित करतो, जाहिरात करतो. जर तुम्ही आमच्या संकेतस्थळावर गेलात तर, तेथे बघाल ज्याला आम्ही लुक बुक म्हणतो, येथे शानदार फॅशन फोटो उपलब्ध आहे, त्याव्यतिरिक्त अनेक सामग्री आहेत, जेथे ग्राहक स्वतःसोबत असणा-या आमच्याकडे सोडून जातात.”

आज “फॅब एली”च्या गटात ३२ लोक आहेत. त्यातील अधिकाधिक सदस्य अगोदर कधी त्यांचे ग्राहक होते आणि त्यांचे वय ३० वर्षापेक्षा कमी आहे. शिवानी यांच्या मते, “हा खूपच ताजातवाना गट आहे, प्रत्येक गटाप्रमाणे आमच्या गटात देखील काही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत, मात्र आम्हाला खूप काही करायचे आहे आणि त्याला पुढील स्तरावर घेऊन जायचे आहे.” भविष्याबाबत शिवानी यांचे म्हणणे आहे की, आमचे लक्ष महिलांवर सलग आहे. महिलांशी संबंधित अनेक क्षेत्र आहेत, ज्यांना आम्ही आतापर्यंत हात लावलेला नाही. इतकेच नव्हे आम्हाला पुरुष आणि मुलांसाठी देखील काहीतरी काहीतरी नवीन करायचे आहे, मात्र या कामाला अद्याप वेळ लागेल. 

आणखी काही महिला उद्यमींच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अभियांत्रिकीचे शिक्षण नसूनही वीजवितरणाच्या डिपी तयार करणा-या कोट्यावधीच्या उद्योगाच्या कर्त्याधर्त्या ‘नेहा म्हैसपूरकर’!

अंतर्मनाची हाक ऐकून इतर स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नरत स्त्रीची कथा

गोपैसाच्या माध्यमातून अंकिता जैनचा बचतीचा मार्ग

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे