Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

अन्न फेकण्यापेक्षा ते भुकेल्याला द्या - फिडींग इंडियाचा स्तुत्य उपक्रम

अन्न फेकण्यापेक्षा ते भुकेल्याला द्या - फिडींग इंडियाचा स्तुत्य उपक्रम

Wednesday March 16, 2016 , 2 min Read

हिरो म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो सिनेमातला अभिनेता. सहा फुटांचा.. करड्या आवाजाचा, हैन्डसम, डॅशिंग. पण तो झाला पडद्यावरचा हिरो... पण प्रत्यक्षातही असे अनेक हिरो आपल्याला भेटतात. ते त्यांच्या कर्तृत्वानं हिरो झालेले असतात. पण आज आम्ही तुम्हाला अश्या हिरोंना भेट करुन देणार आहोत ज्याचं नाव आहे हंगर हिरोज. ते हिरो आहेत फिडींग इंडिया या संस्थेचे.

लग्न, मुंज, घर भरणी असे अनेक कार्यक्रम असतात जिथं मोठ्या प्रमाणात अन्न फुटत जातं, फेकलं जातं. अगदी अनेकदा गाड्याभरुन अन्न फेकलं जातं. हे खूप भयानक आहे. यामुळेच अंकित क्वात्रा यांनी एक नवीन मोहीम सुरु केली. जिचं नाव आहे, हंगर हिरोज. हे हंगर हिरोज शहरात फिरतात. अशा ठिकाणी जातात जिथं हे अन्न फुटक जाणार आहे याची माहिती त्यांना मिळते आणि ते अन्न भुकेल्यांपर्यंत पोचवतात. फिडींग इंडियाच्या माध्यमातून ७५० हंगर हिरोजच्या मदतीनं अडीच लाख लोकांचं पोट भरलं जातंय. 

image


जयपूर इथं राहणारी किर्ती गुप्ता सांगते. “ काही दिवसांपूर्वी आमच्या एका नातेवाईकाकडे पार्टी होती. तिथं ३० वेगवेगळया प्रकारचे पदार्थ होते. पार्टी संपल्यानंतर कळलं की भरपूर अन्न उरलेलं आहे. खुप वाईट वाटलं. आम्ही हंगर हिरोजच्या टीमला बोलावलं आणि ते अन्न गरजू भुकेल्या लोकांपर्यंत पोचवलं.”

“जिथं गरीबांना खायला अन्न नाही तिथं श्रीमंतांच्या पार्टीमध्ये अन्न फुकट जातंय. भरलेल्या प्लेट कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात येतायत. हे अयोग्य आहे. आम्ही जेव्हा याचा विचार केला तेव्हा हे सर्व अन्न एकत्र करुन गरजू लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असं वाटलं. त्यातूनच हंगर हिरोजची संकल्पना पुढे आली.“

ऑगस्ट २०१४ ला या मोहिमेला सुरुवात झाली. हळूहळू हंगर हिरोजची संख्या वाढून ७५० पर्यंत पोचली. “ही आमच्यासाठी एक संधी होती. आमचं यश होतं. आता या जगात कुणी भुकेला राहणार नाही हे आमचं उद्दीष्ट आहे. अन्न दान करुन अनेकांची पोटं भरण्याचं काम आम्ही करतोय.” अंकित सांगत होते.

image


हंगर हिरोजनं २४ तास चालणारी हेल्पलाईन सुरु केलीय. जिथं फोन करुन आपण आपलं उरलेलं अन्न दान करण्यासंदर्भात संपर्क करु शकतो. आता ही सेवा देशभर सुरु करण्यात येणार आहे. अनेक कंपन्यांबरोबर फिडींग इंडियानं संपर्क केलाय. त्याद्वारे आधीच फिडींग इंडीयाला अन्न मिळणार असल्याची माहिती मिळते. तिथे हे हंगर हिरोज जातात आणि लोकांपर्यंत पोचवतात.

हे अन्न अनाथालय, रस्त्यावर झोपणारे मनोरुग्ण आणि इतर लोकांना वाटण्यात येतं. हंगर इंडीयाकडे कोल्ड स्टोरेजपण आहे. अन्न घेताना ते चांगलं आहे ना याची खात्री करुन घेण्यात येते. 

image


आता २४ तास फिडींग इंडियाचा हा उपक्रम सुरु ठेवण्याचा या हंगर हिरोजचा प्रयत्न आहे. 

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एकभुक्त राहून ‘स्किप ए मील’ च्या द्वारे हजारो गरिबांना अन्न अर्पण करण्याचा यज्ञ !

"भूक मिटाओ" मोहिमेमुळे टळली १८०० मुलांची उपासमार

भुकेल्या पोटासाठी रोटी बँक...